नाशिक: निदा खानला अखेर जामीन मंजूर

नाशिक। दि. ७ जुलै २०२६: बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत दाखल गुन्ह्यातील संशयित निदा खानला नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

त्याच गुन्ह्यातील संशयित तौसिफ अत्तार यालाही जामीन मंजूर झाल्याने एका गुन्ह्यात दिलासा मिळाला. तर, संशयित दानिश शेखचा जामीन फेटाळण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिसांत दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, छत्रपती संभाजीनगरातील ‘एमआयएम’चा नगरसेवक मतिन पटेल, घरमालक हानिफ शेख यांच्यावर गुन्हा नोंद आहे. मतिनने निदाला हानिफचे घर उपलब्ध करून देत आश्रय दिल्याने त्यांनाही सहसंशयित केले आहे. या गुन्ह्यात दानिश, तौसिफ व निदा हे तिघे प्रमुख संशयित असून, दानिशवर बलात्काराचा, तौसिफवर विनयभंग, तर निदासह तिघांवर धर्मांतराच्या प्रयत्नाचा ठपका आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790