नाशिक। दि. ६ जुलै २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक मार्फत कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट, सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, सटाणारोड, ता. देवळा, नाशिक या ठिकाणी बुधवार 8 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी डब्लू.एन.एस. ग्लोबल सर्व्हिसेस रिक्त पदे-५०, बॉश लिमिटेड, नाशिक रिक्त पदे-२००, मोंक ऑटोमेशन प्रा.लि. अंबड रिक्त पदे-१०, स्पार्क एच.आर. सोल्युशन, नाशिक रिक्त पदे-२५, युवाशक्ती फाऊंडेशन, नाशिक रिक्त पदे -१५, क्वीस कॉर्प लिमिटेड रिक्तपदे-४०, डी सोर्स, नाशिक. रिक्त पदे-५०, श्रीराम फायनान्स लि. नाशिक रिक्त पदे-१०, लर्ननर प्रा. लि, नाशिक रिक्त पदे-१००, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक रिक्त पदे-०५ अशा एकूण १० पेक्षा जास्त आस्थापना /कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्ह्यातील युवक/ युवतींना मुलाखतीद्वारे विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे
नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.
![]()


