नाशिक। दि. ३० जून २०२६: नाशिक शहरामधील शहर उपविभाग अंतर्गत द्वारका १ कक्ष अंतर्गत द्वारका चौकात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने अंडरपास रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांच्या महत्वाच्या कामानिमित्त बुधवारी १ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत या परिसरातील १२ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
यामध्ये: बागवान पुरा, द्वारका सर्कल, वडाळा नाका, कपूर मार्केट, मोठा राजवाडा, चौक मंडई, चित्रकूट, कावेरी हॉटेल एरिया, बेले लेन, रेणुका नगर, आझाद चौक व परिसर यांचा समावेश असेल. देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


