नाशिक: १ जुलैला ‘सुनेहरी रंगीन यादे’ हिंदी सुमधुर गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा

नाशिक। दि. ३० जून २०२६: अफलातून म्युझिक लव्हर्स आणि सेन्सेशनल म्युझिक इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुनेहरी रंगीन यादे’ हा हिंदी सुमधुर गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम बुधवार, १ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

या संगीतमय कार्यक्रमात लोकप्रिय गायक-गायिका हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर आणि गाजलेल्या गीतांचे सादरीकरण करणार आहेत. संगीतप्रेमींना सुरेल गीतांचा आनंद लुटण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमात सुगंधा शेलार, सुखदा महाजन, शुभांगी कुलकर्णी, क्रांती पवार, उत्पला शिंदे, दीप्ती सदारंगानी, सुनीता साठे, मनिषा गवई, सुवर्णा भारंबे, सुजाता देव, पल्लवी लिंगायत आणि पूजा पाटील या गायिका सहभागी होणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

तसेच हरीशभाई ठक्कर (संस्थापक-अध्यक्ष, अफलातून म्युझिक लव्हर्स), राजेश पाटील (संस्थापक, सेन्सेशनल म्युझिक इव्हेंट्स), अनिल पोटे ((अफलातून आणि सेन्सेशनल ग्रूपचे आधारस्तंभ) , संजोग टिपरे, राजेंद्र पवार, अविनाश देवरुखकर, मनीष मारू, मधुकर नाठे, संजय सिंग, विहार कोडे, संजय दुलगज, स्वानंद पारखी आणि प्रशांत वाघ हे गायक आपल्या सुरेल सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा

कार्यक्रमाचे निवेदन समीरभाई देसाई करणार असून, ध्वनी व्यवस्थापनाची जबाबदारी पवन वंजारी सांभाळणार आहेत. तर कार्यक्रमाचे सिनेमॅटोग्राफी संजय गाडे करणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790