नाशिक: शहराच्या वाहतुकीत आजपासून (दि. ३० जून ) तीन दिवस बदल

नाशिक। दि. ३० जून २०२६: त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीनिमित्त शहरातील वाहतुकीत ३० जून ते ३ जुलै या कालावधीत बदल करण्यात आले आहेत.

३० जून रोजी पालखी सातपूर येथे मुक्काम करेल. त्यानंतर १ जुलै रोजी सातपूरहून प्रस्थान करून पंचायत समिती, श्री रामतीर्थ रामकुंड, काळाराम मंदिरमार्गे गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालय परिसरात मुक्काम राहील. २ जुलै रोजी अमरधाम रोड, ट्रॅक्टर हाऊस, काठेगल्ली मार्गे नाशिकरोड येथे आगमन व दुपारनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पळसे येथे मुक्काम.

🔎 हे वाचलं का?:  ३० जूनपर्यंतच संधी! HSRP नंबर प्लेट अनिवार्य; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

३० जून व १ जुलै प्रवेश बंद मार्ग:
त्र्यंबकेश्वर रोडवरील संस्कृती हॉटेलपावेतो तसेच मायको सर्कल ते एबीबी सिग्नलपावेतो दोन्ही बाजूच्या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्ग : त्र्यंबकेश्वरकडून नाशिक येणाऱ्या एकेरी मार्गावर एबीबी सिग्नल ते संस्कृती हॉटेलपर्यंत दुहेरी वाहतुक सुरू राहील. महिंद्रा सर्कल येथून पंढरीनाथ गांगुर्डे मार्ग, आयटीआय सिग्नलकडून पपाया नर्सरीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांसाठी वाहतुक सुरू राहील.

त्याचप्रमाणे असाही असेल बदल:
१ व २ जुलै : प्रवेश बंद मार्ग : मोडक सिग्नलकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या एकेरी बाजूच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. अशोकस्तंभ ते रविवार कारंजाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तसेच रविवार कारंजा ते-धुमाळ पॉइंट-गाडगे महाराज पुतळा-फुले मार्केट तसेच महात्मा फुले मार्केट ते काजीपुरा पोलिस चौकीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावरील सर्व वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद असेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील तीन दिवस 'यलो अलर्ट'

पर्यायी मार्ग असे:
अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलकडे येणाऱ्या एकेरी मार्गावरून दोन्ही बाजूने येणारी व जाणारी (दुहेरी) वाहतूक चालू राहील. अशोकस्तंभकडून रामवाडी, बायजाबाई छावणीमार्गे वाहने जातील. रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट गाडगे महाराज पुतळा जाणारी वाहतूक ही रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल नेहरू गार्डन शालीमार खडकाली सिग्नल.

🔎 हे वाचलं का?:  ‘स्वामी आहे उभा’ भक्तिगीत रसिकांच्या भेटीला; स्वामी समर्थांच्या भक्तीचा जागवला सुरेल आविष्कार

२ व ३ जुलै:
प्रवेश बंद मार्ग : नाशिक- पुणेरोडवर द्वारका, काठेगल्लीकडून नाशिक रोड, दत्त मंदिर सिग्नल येथून-बिटको चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-नाशिकरोड पावेतो सर्व प्रकारची जड व अवजड वाहने, हातगाडे यांना जाण्यास येण्यास प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग असे:
नाशिकरोड ते द्वारकाकडे येणाऱ्या एकेरी बाजूचे मार्गावरून दोन्ही बाजूने येणारी व जाणारी (दुहेरी) वाहतूक चालू राहील. अवजड वाहने मिरची ढाब्याकडून टाकळीकडे जातील व नांदूर नाका.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790