नाशिक: सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. २३ जून २०२६: शहरातील उपनगर, इंदिरानगर, गंगापूर रोड आणि म्हसरूळ परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे सोनसाखळी चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपींकडून सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ ऑगस्ट रोजी मोपेडवरून आलेल्या दोन चोरट्यांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केले होते. या घटनेचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-२चे उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, हवालदार सुनील आहेर आणि अतुल पाटील यांना संशयितांबाबत माहिती मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रस्ता की मृत्यूचा सापळा? सातपूर-अंबड लिंकरोडवर चिखलामुळे दुचाकी घसरली, एकाचा मृत्यू

त्याआधारे पथकाने हॉटेल मिरची परिसरात सापळा रचून अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रसकर (वय ३३, रा. जेलरोड) आणि कन्हैया विजय पाटील (वय ३६, रा. नाशिकरोड) यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोघांनी विविध भागांत सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांच्याविरुद्ध नोंद असलेल्या आणखी पाच गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790