नाशिक। दि. १० जून २०२६: नाशिक शहर उपविभागअंतर्गत असलेल्या मेरी विद्युत केंद्रातून निघणाऱ्या रविवार कारंजा या ११ केव्ही विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवार ११ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या वाहिनीवरील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
यामध्ये सराफ बाजार,रविवार कारंजा,मेन रोड,घारपुरे घाट आणि अशोकस्तंभ या परिसराचा समावेश असणार आहे. देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


