नाशिक: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 8 जून रोजी बैठक

नाशिक। दि. ६ जून २०२६: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या समितीची त्रैमासिक बैठक सोमवार, 8 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन, देशभरातील प्रतीक्षा संपली !

या समितीकडे ज्या नागरिकांना त्यांचे तक्रार अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी बैठकीच्या दिवशी सादर करावेत किंवा टपालाने पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शरणपूर रोड, तिबेटियन मार्केट, नाशिक या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन समितीचे सदस्य सचिव तथा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790