नाशिक: ‘अमृत’ मार्फत युवकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी

नाशिक। दि १९ मे २०२६: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत ‘अमृत ड्रोन मिशन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणारआहे. जिल्ह्यात यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे, पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेमार्फत प्रसिद्धी पत्रकान्ये करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

शेती, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, चित्रिकरण, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी वाढत असून या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृत संस्था युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील वापर, हवाई सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण युवकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना स्वावलंबी आणि रोजगारक्षम बनवण्यावर भर दिला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्य:स्थितीत समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. ‘अमृत’ संस्थेचे संकेतस्थळ https://mahaamrut.org.in/ आणि तसेच सोशल मीडिया हँडल्स पाहावीत, असेही आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत नाशिक कार्यालय :
9112228770
मयूर हातवळणे : 8830046256 (नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर)
संजय गोसावी – 8857073911 (बागलाण),
दीपक गुप्ता – 9423476929 (मालेगाव),
अजिंक्य कन्नल : 9665692676 (येवला, नांदगाव)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790