नाशिक: निदा खान कशी सापडली ? कुणी दिला होता आश्रय ?

नाशिक। दि. ८ मे २०२६: टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला अखेर नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी (दि. ७) सायंकाळी तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. पण इतक्या दिवस ती कुठे होती, कुणी तिला आश्रय दिला होता.. जाणून घ्या सविस्तर…

🔎 हे वाचलं का?:  दहावीच्या १६.१५ लाख विद्यार्थ्यांचा आज निकाल

सदर प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सलग दोन दिवस ऑपरेशन राबवून आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातून ताब्यात घेतले.

नाशिक पोलिसांच्या SIT तपासामध्ये आरोपीस नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली. तसेच मतीन पटेल याचीही पोलिस पथकांकडून चौकशी करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यास वाहन चालविण्याचा परवाना होऊ शकतो निलंबित

आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान व नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

निदा खानला आज (दि. ८) नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच नारेगावचा नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, आरोपींना आश्रय देणारे व कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. नाशिक पोलीस, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790