नाशिक: शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत बुधवारी (दि. ६) महत्वाचे बदल !

नाशिक। दि. ५ मे २०२६: श्री काळाराम मंदिर येथे उद्या (दि. ६ मे) सायंकाळी होणाऱ्या गंगा-गोदावरी महाआरतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. व्हीव्हीआयपी तसेच मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रामकुंड व गंगाघाट परिसर ‘नो-व्हेईकल’ झोन घोषित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दत्तक प्रक्रियेला नवी दिशा; ८ बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी रात्री १२.०५ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत काळाराम मंदिर, रामकुंड आणि गंगाघाट परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

🚫 प्रवेश बंद मार्ग:
मालेगाव स्टँड कडून रामकुंड ते म्हसोबा पटांगण, ढिकले वाचनालय मार्ग, खांदवे सभागृह मार्ग, सरदार चौक, शनी चौक, नागेश्वर मंदिर मागील मार्ग, काटया मारुती चौक ते सरदार चौक, शिवाजी चौक ते काळाराम मंदिर, तसेच पंचवटी अमरधामकडून रामकुंडकडे येणारे-जाणारे सर्व मार्ग वाहनांसाठी बंद राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख; १० सप्टेंबरपासून ३०० हून अधिक पथकांची तपासणी मोहीम

⤴️ भाविकांसाठी पर्यायी मार्ग:
भाविकांच्या सोयीसाठी रविवार कारंजा–गांधी तलाव, सरकारवाडा–सराफ बाजार मार्ग, नेहरू चौक–दिल्ली दरवाजा तसेच गाडगे महाराज पुतळा–तिवंधा चौक मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🅿️ पार्किंगची व्यवस्था:
भाविकांसाठी रोकडोबा मैदान आणि कपुरथळा मैदान येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक निर्बंधांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790