नाशिक शहरातील ‘या’ भागांत आज (दि. ५) आठ तास वीजपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. ५ मे २०२६: उन्हाळ्याच्या तडाख्यात गोरक्षनगर आणि म्हसरूळ परिसरात मंगळवारी (दि. ५) नागरिकांना वीज कपातीचा सामना करावा लागणार आहे. ११ केव्ही गोरक्षनगर फीडरवर तातडीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने शहरातील उपनगरांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सहा तासांत २० मिमी पावसाची नोंद; पुढील चार दिवस पावसाचा अलर्ट !

हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण ८ ते ९ तासांचा कालावधी अपेक्षित असल्याने सायंकाळी ५ पर्यंत या भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेत काम लवकर पूर्ण झाल्यास वीजपुरवठा वेळेआधी पूर्ववत करण्यात येईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका पोलिसांची धडक कारवाई; चार तडीपार आरोपी जेरबंद, शस्त्र जप्त

महावितरणच्या कामाने हा भाग प्रभावीत:
गोरक्षनगर व विनायकनगर, समृद्धी कॉलनी व रिलायन्स पंपाशेजारील परिसर, गणेशनगर, गीतानगर व वृंदावननगर, स्नेहनगर व छत्रपती शिवाजीनगर, गुलमोहरनगर आणि पुष्पकनगर परिसर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790