मजुरीसाठी आलेल्या दाम्पत्याच्या तीन वर्षीय मुलीवर अत्याचार; युवकाला अटक

निफाड। दि. ४ मे २०२६ (दीपक श्रीवास्तव): पुणे येथील बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरणावरुन संतापाची लाट उसळत असतांना निफाड तालुक्यातील चाटोरी येथे मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील तीन वर्षिय मुलीवर एकोणावीस वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

निफाड तालुक्यातील चाटोरी शिवारात गेल्या महिनाभरापासुन जळगाव जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरासह त्याचे कुटुंबही आले होते. तीन वर्षीय पीडित मुलीचे वडील हे गावी गेलेले असल्याने पिडितेसह तिची आई व मुले चाटोरी शिवारात असतांना दि १ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पिडीतेला तहान लागल्याने पिडितेची आई पाणी आणण्यासाठी बाहेर गेली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

त्यावेळी पिडीतेवर संशयित समीर भाऊसाहेब महाले (१९) अत्याचार केला. पिडितेची आई पिडितेला पाणी घेऊन आली त्यावेळी तिने संशयित हा मुलीवर कुकर्म करत असतांना पाहिले.

त्यामुळे संशयिताने तेथुन पळ काढला. याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन सायखेडा पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहिता ६५(२), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ४(२) ,७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित समीर भाऊसाहेब महाले यास अटक करुन निफाडच्या जिल्हा व सत्र‌ न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप‌ घुगे करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790