नाशिक: शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने ८४ लाखांची ऑनलाइन फसवणूक

नाशिक। दि. ३ मे २०२६: शेअर बाजारात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह दोन व्यावसायिकांची सुमारे ८४ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून ऑनलाइन ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी बनावट अ‍ॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून गुंतवणुकीवर जास्त परतावा दाखवण्यात आला. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधत आरोपींनी फिर्यादींना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास प्रवृत्त केले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला आरोपींनी काही रक्कम परत करून दिली. त्यामुळे खात्री पटलेल्या फिर्यादींनी टप्प्याटप्प्याने एकूण ८५ लाख २५ हजार रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, त्यानंतर कोणताही नफा न देता आरोपींनी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790