बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.79 टक्के; यंदाही मुलींनीच बाजी मारली

पुणे। दि. २ मे २०२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेची (HSC Exam Result 2026) प्रतीक्षा अखेर संपली आहे. या परीक्षेचा निकाल आज शनिवार, 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळमार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे.

राज्य मंडळामार्फत पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत 12 वीचा निकालाबाबत माहिती देत आहेत. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला आहे, तर कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल आहेत. यावर्षी देखील निकाल घटला आहे, यावरती बोलताना कुलकर्णी म्हणाले, निकाल घटण्यामागे कारण मुख्यत्वेकरून मी मागचा निकाल compare करतो त्यामागे कॉपीमुक्त अभियान चांगल्या प्रकारे राबवलं गेलं असं मला वाटतं.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

गेल्या वर्षी एकाही कर्मचाऱ्यावरती कारवाई झाली नव्हती, यावेळी 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 91.88 निकाल होता यावर्षी 2.0 टक्क्याने निकाल कमी झाला आहे.

त्रिगुण कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं की, फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा 153 विषयांचे परीक्षा घेण्यात आली. नऊ विभागीय मंडळातून राज्यात एकूण 14 लाख 58 हजार एवढ्या मुलांनी परीक्षा दिली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 89.79 टक्के इतका लागला आहे.

🔎 हे वाचलं का?:  निफाड ड्राय पोर्ट ठरणार नाशिकसाठी मोठे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब; कृषी निर्यात, उद्योग आणि रोजगाराला मिळणार मोठी चालना

बारावीचा गेल्या वर्षीचा निकाल पाहिला असता 91.88 टक्के लागला होता. दरवर्षी प्रमाणं मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती. मुलींच्या निकालाची टक्केवारी 94.54 टक्के इतकी होती. तर, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.51 टक्के इतकी होती. तर कॉपी घडू नये यासाठी अनेक जण लक्ष ठेवून होते, परिक्षा अतिशय चांगल्या पध्दतीने घेण्यात आली एकूण 15 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या परिक्षेदरम्यान 100 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

यंदाही 12 वीच्या निकालाटी टक्केवारी घटली असली तरी, 12 वीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून 93.15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

👉 पुणे: 91.25%
👉 नागपूर: 88.67%
👉 छत्रपती संभाजीनगर: 88.68%
👉 कोल्हापूर: 89.97%
👉 अमरावती: 90.92%
👉 नाशिक: 90.72%
👉 लातूर: 84.14%
👉 कोकण: 94.14%
👉 मुंबई: 90.08%

दुपारी एक वाजल्यानंतर ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

Maharashtra 12th Result 2026: खालील वेबसाईटवर निकाल पाहता येणार
राज्य मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार

👉 https://results.digilocker.gov.in
👉 https://mahahsscboard.in
👉 https://hscresult.mkcl.org
👉 https://results.targetpublications.org
👉 https://results.navneet.com
👉 https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results.

वरती देण्यात आलेल्या वेबसाईटवरती 12 वीचा निकाल पाहता येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790