नाशिक शहरातील ‘या’ मार्गावरील वाहतुकीत पुढील तीन महिने महत्वाचे बदल

नाशिक। दि. २९ एप्रिल २०२६: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून अंबड एमआयडीसीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी २९ एप्रिल २०२६ पर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने ३० एप्रिल ते २९ जुलै २०२६ या कालावधीसाठी नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुन्हा वळसा घालूनच प्रवास करावा लागणार आहे.

🚫 प्रवेश बंद मार्ग-१:
गरवारे टी पॉईंट कडुन एक्स्लो पॉईंट कडे
जाणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याने सदर मार्ग बंद करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

⤴️ पर्यायी मार्ग:
गरवारे टी पॉइंट कडुन एक्स्लो पॉईंटकडे जाणारी वाहने दुभाजकाच्या उजवे (विरूध्द) बाजुच्या मार्गावरून गरवारे टी पॉईंट – कॉम्प्टन कंपनी – ब्लु क्रॉस कंपनी – ग्लॅक्सो कंपनी टी पॉईंट- सिमेन्स कंपनी पॉवर हाऊस टी पॉईट पंक्चर – नेटविन कंपनी पंक्चर – आरपी स्विट टी पॉईंट पंक्चर-सिमेन्स कंपनी – नाशिक क्लस्टर कंपनी येथुन दुभाजकाचे डावे बाजुने – एक्स्लो पॉईंट मार्गे पपाया नर्सरी व इतरत्र वळविण्यात आली आहे.

🚫 प्रवेश बंद मार्ग-२:
एक्स्लो पॉईंट कडुन गरवारे टी पॉईंट कडे
येणाऱ्या मार्गावर गरवारे ते एक्स्लो कडे जाणारी वाहतुक वळविण्यात आली असुन एक्स्लो कडुन गरवारे कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत असुन सदर वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: APK फाईल डाऊनलोड करताच व्यावसायिकाची १.६९ लाखांची ऑनलाइन फसवणूक

⤴️ पर्यायी मार्ग:
एक्स्लो पॉईंट कडुन गरवारे कडे येणारी वाहने ही एक्स्लो पॉईंट येथुन डावी कडे वळुन प्रणव स्टैंटॅपिंग टी पॉईंट – टेक्नोफोर्स कंपनी – उजवे बाजुला वळण घेवुन – अजिंठा हॉटेल समोरून – आकाश उ‌द्योग टी पॉईंट – ईलेक्ट्रो स्क्रिम्प कंपनी – सेंट्रल वेअर हाउस – संजीवनी बॉटेनिकरल टी पॉईंट – सरळ महेश कंपनी – डेल्टा कंपनी लिअर कंपनी – सिबल कंपनी – जेमिनी इन्फोटेक – एबीबी कंपनी- हॉटेल उत्सव टी पॉईंट- सरळ- टाल्को इंडिया कंपनी – उजवे वळण- रेन्बो कंपनी अरिहंत अल्युमिनीअम कं- हॉटेल वेलकम – एनएच-३ हायवे सर्व्हिस रोडने उजवीकडे वळण – गरवारे टी पॉईंट येथुन हायवेने मुंबई कडे जातील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

कामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग आणि रेडियमचे दिशादर्शक फलक लावणे अनिवार्य आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ३० ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करावी. रात्री कामाच्या ठिकाणी ब्लिंकर्स, पुरेसा प्रकाश तसेच रिफ्लेक्टिव्ह जॅकेटचा वापर करणे बंधनकारक आहे. कोणताही अपघात झाल्यास त्याची संपूर्ण असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जबाबदारी संबंधित विभाग आणि ठेकेदाराची असेल,

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790