नाशिक: एम. जी. रोडला मोबाइल दुकानात अमली पदार्थ सेवन; एनडीपीएसखाली गुन्हा दाखल

नाशिक। दि. २६ एप्रिल २०२६: एम. जी. रोड परिसरातील मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी छापा टाकून एका तरुणाला रंगेहाथ अटक केली. या कारवाईत संशयिताकडून ‘डोडा’ प्रकारातील अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  व्यावसायिक सिलिंडर झाले 'इतक्या' रुपयांनी स्वस्त...

अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव शैतान उर्फ चेतन तेजाराम सियाक (वय २५, रा. अशोकस्तंभ, मूळ रा. राजस्थान) असे आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एम. जी. रोडवरील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानात अमली पदार्थांचे सेवन होत असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने तातडीने छापा टाकला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

छाप्यामध्ये सियाक हा ‘डोडा’ पावडर पाण्यात मिसळून, कापसाच्या सहाय्याने गाळून सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत संबंधित साहित्य जप्त केले.

दरम्यान, सियाक हा राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील सांचोर येथील रहिवासी असून सध्या नाशिकमधील अशोकस्तंभ परिसरात वास्तव्यास आहे. तो मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली असून, त्याचा पूर्व इतिहास तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790