उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार

नाशिक। दि. २१ एप्रिल २०२६: उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मुंबई एलटीटी ते सुलतानपूर आणि एलटीटी ते वाराणसी दरम्यान ३४ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे चालविणार आहेत.

गाडी क्रमांक ०४२११ साप्ताहिक विशेष रेल्वे २१ मे ते १६ जुलै या कालावधीत दर गुरुवारी एलटीटी येथून १४:३५ वा. सुटेल आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी २३ वा. पोहोचेल. गाडी क्रमांक ०४२१२ साप्ताहिक विशेष २० मे ते १५ जुलै या कालावधीत दर बुधवारी सुलतानपूर येथून ४ वाजता सुटेल, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२:२० वा. पोहोचेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

एलटीटी- वाराणसी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०४२२५ ही २२ जून ते १० जुलै दरम्यान दर शुक्रवारी मुंबई येथून १४:३५ वाजता सुटेल आणि वाराणसी येथे तिसऱ्या दिवशी ०२:०५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०४२२६ साप्ताहिक विशेष रेल्वे २१ मे ते ९ जुलै या कालावधीत दर गुरुवारी वाराणसी येथून ०१:३५ वा. सुटेल आणि मुंबईत दुसऱ्या दिवशी १२:२० वा. पोहोचेल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790