नाशिक। दि. १४ एप्रिल २०२६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १४) वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्ग बंद असेल. त्याऐवजी पर्यायी मार्गावरुन वाहने न्यावीत, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. दरम्यान, उत्सवानिमित्त पाथर्डी फाटा आणि नाशिकरोड येथेही अशाचप्रकारे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
हा मार्ग बंद : राजवाडा (भद्रकाली) ते सी. बी. एस. या मार्गावरील वाकडी बारव, कादिर चौक, फाळके रोड, फुले मार्केट, भद्रकाली मार्केट, गाडगे महाराज पुतळा, नेहरू गार्डन, शालीमार, शिवाजी रोड आदी सर्व प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.
पर्यायी मार्ग : राजवाडा- मंडईकडील वाहने सारडा सर्कलमार्गे वळवली जातील, तर दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा येथून शालीमार, सीबीएसकडे जाणारी वाहतूक पेठ फाटा-मखमलाबाद नाका-रामवाडी पूल-अशोकस्तंभ मार्गे सिडको व व नाशिकरोड कडे वळविण्यात येईल.
![]()

