नाशिक: सोमवारी (दि.१३) विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

नाशिक। दि. १२ एप्रिल २०२६: येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक १३ एप्रिल, २०२६ रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महसूल अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणारा विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेली प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात. या विभागीय लोकशाही दिनासाठी येताना जिल्हास्तरीय लोकशाही दिन उपक्रमात दिलेले उत्तर आणि टोकन क्रमांक अर्जदारांनी सोबत आणणे आवश्यक आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. ११) महत्वाचे बदल
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790