नाशिक: शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत आज (दि. ११) महत्वाचे बदल

नाशिक। दि. ११ एप्रिल २०२६: महात्मा फुले जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी नाशिक शहरात निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शहर वाहतूक शाखेकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल.

मिरवणूक मुंबई नाका सर्कल येथून सुरू होऊन द्वारका सर्कल, शालिमार, दहीपूल, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, गाडगे महाराज पुतळामार्गे महात्मा फुले पुतळा येथे पोहोचणार आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी संबंधित मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

प्रवेश बंद (मिरवणूक मार्ग):
मुंबई नाका सर्कलपासून सुरुवात मदिना चौक नॅशनल हायस्कूल सारडा सर्कल फाळके रोडने-हाजी टी पॉइंट-महात्मा फुले मार्केट-दूध बाजार चौक बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोडमार्गे-धुमाळ पॉइंट-दहिपूल (प्रकाश सुपारी शॉप) नेहरू चौक-दिल्ली दरवाजा पुढे गाडगे महाराज पूल आयुर्वेदिक हॉस्पिटल-मनपा शाळा क्र. ३० महात्मा फुले पुतळा येथे समारोप.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

पर्यायी मार्ग याप्रमाणे:
द्वारकाकडून येणारी वाहने सरळ मुंबईनाका सर्कल- इंदिरानगर बोगदा आर.डी. सर्कल-सिटी सेंटर मॉल सिग्नलमार्गे जातील. इंदिरानगर बोगद्याकडून येणारी वाहने ही मुंबईनाका सर्कल महात्मा फुले पुतळ्याच्या पाठीमागून सरळ वडाळा नाकाकडे जातील. सीबीएसकडून येणारी वाहतूक ही गडकरी सिग्नल-चांडक सर्कल-सिबल फर्निचरमार्गे वळविण्यात आली आहे. मेनरोडकडे जाणारी वाहने नेपाळी कॉर्नर-शालिमार – सीबीएसमार्गे जातील. गाडगे महाराज पुलाकडे जाणारी वाहने सप्तश्रृंगी देवी मंदिर अमरधाम रोडमार्गे मार्गस्थ होतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790