म्हाडा प्रकरण: ४५ व्यावसायिकांच्या अटकपूर्व जमैनावर आज (दि. २७) सुनावणी

नाशिक। दि. २७ मार्च २०२६: म्हाडा भूखंड अपहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या ४५ बिल्डरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज शुक्रवारी (दि. २७) सुनावणी होणार आहे. या प्रकरणात बिल्डर मनवाणीला अटक केली आहे.

कारवाईच्या भीतीने इतर व्यावसायकांनी पलायन केले आहे. भूमी अभिलेख विभागाच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसात बडे बिल्डर, मनपाचे तत्कालीन पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेच्या २२ पथकांकडून संशयितांचा शोध सुरू असून गायकवाडनगरात एका व्यावसायिकाच्या घरी पथकाने झडती घेतली.

🔎 हे वाचलं का?:  रेल्वे तिकीटांच्या नियमांत महत्वाचे बदल; एप्रिलपासून होणार लागू… जाणून घ्या सविस्तर…

जमीन लाटण्याकरिता बिल्डरांनी जमिनीचे तुकडे करत त्या विकसीत केल्या. म्हाडाला २ हजार चौ. मी. जागा न सोडता खोटे बनावट कागदपत्र देत कोट्यवधींच्या जमिनीचा अपहार करत भूमी अभिलेख, म्हाडा, महसूल विभागाची फसवणूक केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790