पुणे। दि. २७ मार्च २०२६: हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
पुढील ४ ते ५ दिवस विशेषतः ३० आणि ३१ मार्च रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

