नाशिक शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत आवाज (दि. २६) महत्वाचे बदल

नाशिक। दि.२६ मार्च २०२६: श्रीराम नवमीनिमित्त आज गुरुवारी (दि. २६) श्री काळाराम मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याकरता सरदार चौक, लक्ष्मण झुला, शनि चौक, शिवाजी चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजाकडे येणाऱ्या दोन्ही बाजूने येण्या-जाण्यासाठी तसेच शिवाजी चौक ते सीतागुंफाकडे जाणाऱ्या रोडवर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  रेल्वे तिकीटांच्या नियमांत महत्वाचे बदल; एप्रिलपासून होणार लागू… जाणून घ्या सविस्तर…

प्रवेश बंद मार्ग : सरदार चौक, लक्ष्मण झुला, शनि चौक, शिवाजी चौक ते श्री काळाराम मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनांना प्रवेश बंद राहील. या मार्गावरील वाहनचालकांनी २६ मार्चला सकाळी ५ ते रात्री १२ पर्यंत बाह्य पर्यायी मार्गाचा वापर करावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790