नाशिक: रेकी करून घरफोड्या करणारे दोन सराईत अटकेत; ७ घरफोड्या उघड

नाशिक। दि. २२ मार्च २०२६: बंद घरांची रेकी करून घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने अटक केली आहे. नवले पुल परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. करण काळुसिंग जुनी (रा. अरिंगळे मळा) व विक्रम तानाजी पऊळ (रा. चव्हाण मळा, नाशिकरोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भारतीय स्टेट बँकेच्या शासकीय व्यवहारांच्या शाखा 31 मार्चला मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार

संशयितांकडून सात घरफोडीच्या गुन्ह्यांतील सुमारे १० लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उपनिरीक्षक संदीप पवार यांनी याबाबत माहिती दिली.

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही ठिकाणी खिडक्यांचे गज कापून चोरी केल्याची समान पद्धत आढळून आली. या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयितांचे वर्णन समोर आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन प्रकरणात महत्वाची घडामोड… वाचा सविस्तर..

तपासादरम्यान पोलिस कर्मचारी दत्तात्रय चकोर आणि मंगेश जगझाप यांना माहिती मिळाली. दोघे संशयित चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नवले पुल परिसरात सापळा रचला. पथकातील प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई आणि भरत राऊत यांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे ७ घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790