नाशिक: शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत शनिवारी (दि. २१) महत्वाचे बदल…

नाशिक। दि. २० मार्च २०२६: रमजान ईदनिमित्त शनिवारी (दि. २१) ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार असल्याने त्र्यंबकरोडवर प्रवेश बंद करण्यात आला असून, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

प्रवेश बंद मार्ग : मोडक सिग्नल ते मायको सर्कल दोन्ही बाजूची वाहतूक बंद, गडकरी सिग्नल ते चांडक सर्कल जाणारी येणारी वाहतूक बंद राहिल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहराच्या तापमानात एकाच दिवसांत तीन अंशांची वाढ

पर्यायी मार्ग : मायको सर्कलकडून मोडक सिग्नलकडे येणारी वाहतूक मायको सर्कल इतरत्र जाईल, मोडक सिग्नलकडून चांडक सर्कलकडे जाणारी वाहतूक संदीप हॉटेलमार्गे इतरत्र जाईल. चांडक सर्कलकडून गडकरी सिग्नलकडे जाणारी वाहतूक मुंबई नाकामार्गे इतरत्र जाईल.

वाहतूक पोलिस बंदोबस्त : सारडा सर्कल, वेद मंदिर, भवानी सर्कल, गोल्फ क्लबमागील रस्ता, जलतरण तलाव, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, मनपा अयुक्त बंगला, ठक्कर बाजार, अण्णा भाऊ साठे पुतळा, खडकळी सिग्नल बॅरिकेडिंग व बंदोबस्त पॉईंटवर २ उपनिरीक्षक ३३ अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790