नाशिक : अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणात ८ जणांवर गुन्हा; १५८ सिलिंडर जप्त

नाशिक। दि. १८ मार्च २०२६: सातपूर परिसरातील एमआयडीसीतील नाईस एरियामध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगवर पुरवठा विभाग व सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी एजन्सी मालक, डिलिव्हरी कर्मचारी तसेच वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यांसह एकूण आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. पुरवठा निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेडमधून अंदाजे २५ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ४.९२ लाख रुपये किमतीचे १५८ सिलिंडर, १४ हजारांचे १० भरलेले व्यावसायिक सिलिंडर, ६.३५ लाखांचे २८९ रिकामे सिलिंडर तसेच ११ हजारांचे ११ रिकामे व्यावसायिक सिलिंडर यांचा समावेश आहे. याशिवाय एमएच १५ बीजे २५३०, एमएच १२ एलटी ६२९२, एमएच १५ एफव्ही ५०८५, एमएच १५ जेए ५४१६ आणि एमएच १५ जेए ४८३१ क्रमांकांची वाहनेही जप्त करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

या प्रकरणी प्रवीण साळुंखे, समाधान सोळंकी, रवींद्र खंडाळे, सिद्धार्थ निराळे, तेजस आढळकर, प्रितम राजपूत, व्ही. प्रताप आणि एजन्सी मालक हर्षल सरनाईक यांच्यावर सातपूर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790