नाशिक: रंगपंचमीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; २ हजार पोलिस, ९०० होमगार्ड तैनात

नाशिक। दि. ८ मार्च २०२६: रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात सुमारे दोन हजार पोलिस कर्मचारी आणि ९०० होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

या बंदोबस्तामध्ये ४ पोलिस उपायुक्त, ६ सहाय्यक पोलिस आयुक्त, ३८ पोलिस निरीक्षक तसेच ९४ सहाय्यक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या संख्येने पोलिस अंमलदार शहरातील विविध भागांमध्ये तैनात राहणार आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने एक एसआरपीएफ कंपनी, दोन आरसीपी पथके, १४ एटीसी पथके, ४ क्यूआरटी पथके, १० गुन्हे शाखा पथके आणि ५ विशेष शाखा पथके कार्यरत राहतील. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ४८ दामिनी मार्शल शहरात गस्त घालणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

दरम्यान, रंगपंचमीदरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790