नाशिक: विवाहितेवर अत्याचार प्रकरणी फरार संशयिताला कन्नड येथून अटक

नाशिक। दि. ६ मार्च २०२६: विवाहितेवर अत्याचार करून फरार झालेल्या १९ वर्षीय संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट–२च्या पथकाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे अटक केली. हर्षल रमेश परदेशी (रा. बोरमाळ तांडा, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा संबंधित विवाहितेच्या घरी पाहुणा म्हणून आला होता. यावेळी तिचा पती रात्रपाळीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून संशयिताने ओढणीच्या साहाय्याने विवाहितेचे हात बांधले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

घटनेनंतर संशयित फरार झाला होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट–२चे कर्मचारी मनोहर शिंदे व चंद्रकांत गवळी यांना संशयिताच्या हालचालींबाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने कन्नड येथे सापळा रचत संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790