नाशिक: आदिवासी मुलींसाठी सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण; 24 मार्चपर्यंत प्रवेशाची संधी

नाशिक। दि. ५ मार्च २०२६ (जिल्हा माहिती कार्यालय): प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प नाशिक कार्यालयामार्फत आदिवासी मुलींसाठी सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणासाठी 6 ते 24 मार्च 2026 या कालावधीत आवश्यक पात्रतेनुसार सत्र क्रमांक 101 साठी मुलींसाठी प्रवेश सुरू आहेत. इच्छुक पात्र मुलींनी सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, पेठरोड, नाशिक येथे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

अशी आहे आवश्यक पात्रता:
उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. वय 18 ते 25 वर्षे असावे. किमान उंची 150 से.मी., वजन 48 कि.ग्रॅ. आवश्यक आहे. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता 10 वी व 12 वी गुणपत्रक, आधिवास प्रमाणपत्र, व नाव नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिन्यांचा असून प्रशिक्षण सत्र 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे 25 मार्च 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता शारीरिक व बौद्धीक चाचणी घेवून प्रशिक्षणार्थीची निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना भोजन, निवास व गणवेश सुविधा पुरविण्यात येणार आहे. प्रशिक्षणात ग्रंथालय सुविधा, आधुनिक व्यायाम, व सामान्य ज्ञान अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख – मोबाईल क्रमांक 9420269023 व उपकेंद्रप्रमुख -मोबाईल क्रमांक 8007980916 यांच्याशी संपर्क साधावा, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती ठुबे यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790