नाशिक: कृषी कुंभ 2026 महोत्सवासाठी स्टॉल नोंदणी करण्याचे आवाहन

नाशिक। दि. ५ मार्च २०२६: जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 16 मार्च 2026 या कालावधीत युथ फेस्टीवल मैदान, नाशिक येथे कृषी कुंभ 2026 चे आयोजन केले आहे. या 5 दिवसीय प्रदर्शनात 400 पेक्षा अधिक स्टॉल्सच्या माध्यामातून कृषी क्षेत्रातील क्रांती दर्शविली जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ‘कृषीकुंभ २०२६’चे आयोजन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा होणार जागर !

इच्छुक कृषी निविष्ठा उत्पादक, यंत्रसामग्री कंपन्या, बँका, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि बचत गटांनी नोंदणीद्वारे आपले स्टॉल आरक्षित करावे व नाविण्यपूर्ण प्रदर्शन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रदर्शनात कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) आणि कृषी ड्रोनची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, नैसर्गिक शेती, बायोचार, हायड्रोपोनिक्स आणि जलतारा मॉडेलद्वारे शाश्वत शेतीबाबत माहिती, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त विशेष सोहळा आणि शेतीतील जुगाड स्पर्धा, सांस्कृतिक मेजवाणीत महाराष्ट्राची हास्यजत्रा, फोक लोक आणि नाशिकची प्रसिद्ध खाऊ गल्ली यांचा समावेश असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  तपोवन वृक्षतोड प्रकरण: नाशिक मनपाला उच्च न्यायालयाचा दणका

असे आहेत स्टॉल बुकींगसाठी संपर्क क्रमांक
महेश वेठेकर (कृषी उपसंचालक)- 9970727672
हितेंद्र मोरे (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक)- 9421123464

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790