नाशिक शहरात उद्यापासून चौथे विश्व मराठी संमेलन; नाव नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध

नाशिक। दि. २५ फेब्रुवारी २०२६: नाशिक येथे २७ व २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजकांनी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली असून नाव नोंदणीसाठी इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

चौथ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कवीवर्य कुसुमाग्रज नगरीत विविध मंच उभारण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागाने देश- विदेशातून येणाऱ्या मराठी भाषिक प्रेमींना नाव नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक https://vishwamarathisammelan.com उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर जाऊन इच्छुक नाव नोंदणी करू शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790