नाशिक येथे 20 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिक। दि.१८ फेब्रुवारी २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक कार्यालयाच्या वतीने शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत जागेवर निवड संधी चे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या मेळाव्यात एकूण 60 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नोकरी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात श्रीराम फायनान्स लि.नाशिक रिक्त पदे 55, ऑटासेल इलेक्ट्रोमेक प्रा.लि. रिक्त पदे 5 अशा एकूण 60 रिक्त पदांसह या नियोक्ते सहभागी होणार असून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790