नाशिक: बालयेशू यात्रेला आजपासून प्रारंभ; नाशिक–पुणे महामार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल

नाशिक, दि. १४ फेब्रुवारी २०२६: नाशिक–पुणे महामार्गावरील बालयेशू चर्च येथे आजपासून (दि. १४) दोन दिवसीय बालयेशू यात्रेला प्रारंभ होत आहे. शनिवार व रविवार (दि. १४ व १५) दरम्यान होणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासन आणि चर्च व्यवस्थापनातर्फे व्यापक तयारी करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

देशभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रार्थना घेऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. परिसरात खाद्यपदार्थांची दुकाने, विविध आकारांच्या मेणबत्त्यांचे स्टॉल तसेच ख्रिश्चन मिशनरी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

वाहतुकीत बदल:
यात्रेनिमित्त सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पुणे महामार्गावर भाविकांची वाहने मोठ्या प्रमाणावर जमा होऊन कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात आला आहे.

जेतवन नगरकडून जयभवानी रोडकडे ये-जा करणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने घंटी म्हसोबा मंदिर, डावखरवाडी मार्गे जयभवानी रोडकडे वळवण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

संबंधित अधिसूचना दोन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. भाविकांनी प्रशासनाने सूचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790