🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

सुवर्ण संचय योजनेत अपहार प्रकरणी सराफ व्यावसायिकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल

नाशिक। दि. ११ फेब्रुवारी २०२६: सुवर्ण संचय योजनेत आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी कॅनडा कॉर्नर येथील एका सराफ व्यावसायिकासह दुकानाच्या महिला मॅनेजरविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निफाड येथील रहिवासी डॉ. रोहिणी घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०२४ ते जून २०२५ या कालावधीत संबंधित सराफ दुकानाचे मालक संशयित अजय लोखंडे आणि मॅनेजर पूजा वाघ यांनी सुवर्ण संचय योजनेची माहिती देत जादा परतावा किंवा गुंतवणुकीइतक्या मूल्याचे सोने देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून तक्रारदारांनी दरमहा १८,३६३ रुपये याप्रमाणे १३ हप्त्यांत एकूण सुमारे २ लाख ४२ हजार रुपये रोख स्वरूपात जमा केले.

🔎 हे वाचलं का?:  उन्हाळ्याची चाहूल; शहरात कमाल तापमान ३२.८ अंशांवर

मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम किंवा त्याऐवजी सोने मागितले असता संबंधितांनी टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच पद्धतीने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790