नाशिक शहरात पुन्हा थंडीची चाहूल; किमान तापमान १० अंशांवर घसरले

नाशिक। दि. ८ जानेवारी २०२६: शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र होते. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होणे आणि ढगाळ हवामान यामुळे गारवा कमी जाणवत होता. मात्र आज (दि. ८) पहाटेपासून वातावरणात पुन्हा बोचरी थंडी जाणवू लागली.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

गेल्या २४ तासांत किमान तापमानात २.७ अंश सेल्सिअसची घसरण नोंदविण्यात आली. मागील दिवसांत किमान तापमान १४.९ अंशांपर्यंत वाढले होते, तर कमाल तापमानही सुमारे २८ अंशांपर्यंत पोहोचल्याने थंडीचा प्रभाव लोप पावला होता. आज सकाळी ढगांचा अडथळा नसल्याने तापमान वेगाने खाली येत १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

आर्द्रतेच्या प्रमाणातही घट झाली असून मंगळवारीच्या तुलनेत आज ६६ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली. सकाळच्या वेळेत काही भागांत हलके धुके पसरलेले दिसून आले, तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. सध्या थंडीपासून मिळालेला दिलासा संपत असून येत्या दोन दिवसांत पुन्हा कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790