🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: व्यावसायिक वाहनांसाठी ‘एमएच १५ केएस’ मालिका सुरू; लिलाव प्रक्रियेला सुरुवात

नाशिक। दि. २६ डिसेंबर २०२५: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहन संवर्गातील (व्यावसायिक) वाहनांसाठी ‘एमएच १५ केएस’ ही नवीन मालिका बुधवारी (दि. २४) पासून सुरू करण्यात आल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  रेरा बंद व्हायला हवा, याने पीडितांऐवजी कर्जबुडव्या बिल्डरांना मदत : सुप्रीम कोर्ट

आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज आज सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कार्यालयाच्या आवक-जायक कक्ष क्रमांक विभागात जमा करणे अनिवार्य राहील. ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल, अशा अर्जदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शुक्रवारी (दि. २६) दुपारी ४ वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी बोलीच्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावे, असे आवाहन आरटीओने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790