नाशिक/पुणे। दि. १ डिसेंबर २०२५: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. हवामान विभागाकडून देखील थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेत थंडीची लाट येणार आहे. 3 ते 6 डिसेंबर महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दिवसा ढगाळ वातावरण राहू शकतं. मात्र रात्री पुन्हा कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात यंदा थंडी वाढताना दिसत आहे. तसंच ला निनाचा इफेक्टही पाहायला मिळू शकतो. त्यामुळे थंडीचा जोर दोन महिने राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात एक अंकी तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शीतलऱींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या सर्व ठिकाणी शीत लहरींचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमधील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
![]()
