नाशिक। दि. ३० नोव्हेंबर २०२५: तालुक्यातील डोंगराळे अत्याचारप्रकरणी न्यायालयात खटला चालवण्यासाठी शासनातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्याचार पीडित कुटुंबियांनी शनिवारपासून गावात सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची त्वरित दखल घेत शासनाकडून निकम यांच्या नियुक्तीची घोषणा शनिवारी करण्यात आली.
खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविताना विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र त्याचे आदेश निघाले नव्हते. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बालिकेच्या कुटुंबियांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
फिर्यादी पक्षातर्फे न्यायालयात खटला चालवण्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. राज्याच्या कायदा व न्याय विभाग अधिकारी वैशाली पी. बोरुडे यांनी हे नियुक्तिपत्र जारी केले आहे. मात्र फास्ट ट्रॅक न्यायालयाचे आदेश अद्याप निघालेले नाहीत.
![]()
