
नाशिक/धुळे। दि. २८ नोव्हेंबर २०२५: अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स (कृती) नाशिक आणि धुळे पोलीस यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत धुळे जिल्ह्यातील जामन्यापाणी गावात छापा टाकून गांजाच्या झाडांची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत एकूण १ कोटी २ लाख ५० हजार रुपये किमतीचा २०५० किलोग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला आहे.
दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस उपाधीक्षक (अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स (कृती) नाशिक) गुलाबराव पाटील, यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जामन्यापाणी या गावात वनजमिनीवर गांजाच्या झाडांची अवैध रित्या लागवड करण्यात आली आहे.
त्यावरुन अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस अशांनी छापा टाकला असता तेथे 1) कालुसिंग गोंडा पावरा (वय: ३५ वर्ष, रा धावडा, तालुका वराला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश.), 2) कृष्णा तारासिंग पावरा (वय: २५ वर्ष, गाव सातपाणी, पोस्ट महादेव, तालुका शिरपूर जिल्हा धुळे.), 3) हरबा कुवरसिंग पावरा (वय: २७ वर्ष, रा गाव तायक्यपाणी, तालुका वराला जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश.), 4) गोंडा नाना पावरा (वय: ५५ वर्ष, रा धावडा, तालुका वराला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश.), 5) गुलाब हाण्या पावरा, (वय: ५५ वर्ष, गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे.), 6) कांतीलाल गुलाब पावरा (वय: २५ वर्ष, गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे.), 7) रमेश गुलाब पावरा (वय: २१ वर्ष गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर, जिल्हा धुळे) असे वनजमिनीवर सामुहिकरित्या गांजा झाडांची (कॅनाबिस प्लांटची) अवैध रित्या लागवड करुन देखभाल व रखवाली करतांना मिळुन आले.
त्यानंतर या ठिकाणी कायदेशीर पंचनामा करुन गांजाची काही झाडे कापुन व उपटुन त्यांचे प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे 21 गठ्ठे बांधुन एकुण 1050 किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचे ठिकाण हे अतिदुर्गम वन परिसरात असल्याने सायंकाळी 07.00 वाजेच्या सुमारास अपरात्र झाल्याने कारवाई थांबवण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी पंचनामा कारवाई पुन्हा सुरु करुन प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे 20 गठ्ठे बांधुन 1000 किलोग्रॅम वजनाची गांजा झाडे जप्त करण्यात आली. याप्रमाणे दोन दिवसात एकुण 1,02,50,000 रुपये किंमतीचा 2050 किलोग्रॅम वजनाचा गांजा सदर कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शिरपुर तालुका पोलीस ठाणे गुरनं. 294/2025 NDPS अधिनियम 1985 चे कलम 8 (ब) (क), 20 (क), 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयात 7 ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि भागवत व्यवहारे नेमणुक अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स (कृती) नाशिक हे करीत असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 30/11/2025 रोजी पर्यंत 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे.
सदरची कामगिरी अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अधीक्षक मकानदार, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहायक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे, माधवानंद धोतरे, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, हेड कॉन्स्टेबल गणेश ढामले, राधेश्याम जंगलू पवार, प्रशांत सतिष देशमुख, वैभव रामदास पांढरे, भास्कर पांडु चव्हाण, दिनेश अशोक शिंदे, चेतन चंद्रकांत चव्हाण, स्वप्निल प्रल्हाद वारडे, किशोर बाळासाहेब बर्गे, अर्जन वसंतराव बंद्रे, अनिल मुरलीधर पास्ते, गणेश नंदकुमार मिसाळ, कालिचरन बिऱ्हाडे यांनी केली असुन धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, संतोष पाटील, सागर ठाकुर, चत्तरसिंग खसावद, संदीप ठाकरे, राजु ढिसले, अल्ताफ मिर्झा, गिरधर पाटील, प्रकाश भिल, धिवरे, संजय भोई, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, भुषण पाटील, कृष्णा पावरा, इसरार फारुकी यांच्या पथकाने केली.
![]()
