नाशिक। दि. २५ नोव्हेंबर २०२५: अनामिक सेवाभावी संस्था गेली सात वर्षे सातत्याने संविधान गौरव यात्रेचे आयोजन करत आहे, तसेच या ही वर्षी दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान गौरव यात्रेचे आयोजन केले गेले आहे. ही यात्रा सकाळी ७:30 वा भोसला भवन येथून सुरु होऊन संविधान चौक ( कृषी नगर चौक ) येथे समारोप होईल.
सदर यात्रेत विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षकांसमवेत सहभागी होणार असून नाशिककर हि सहभागी असतील तसेच शालेय मुलांचे पथनाट्य , वेशभूषा सादरीकरण होईल.
विजय रिसे (सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाशिक ) व हर्षदा बडगुजर (जिल्हा समाजकल्याण अधिकार, जिल्हा परिषद नाशिक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तरी सर्वांनी या यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अनामिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
