नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७५ हजार १७३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ८ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३६४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५५८, चांदवड १२६ , सिन्नर ८६६, दिंडोरी २२४, निफाड ८२५, देवळा ८९, नांदगांव २२४, येवला ८६, त्र्यंबकेश्वर ७१, सुरगाणा १०, पेठ ३१, कळवण १०७, बागलाण १८५, इगतपुरी १३३, मालेगांव ग्रामीण २३७ असे एकूण ३ हजार ७७२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार १७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३३१ तर जिल्ह्याबाहेरील ११६ असे एकूण ८ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ७५ हजार १७३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.८९, टक्के, नाशिक शहरात ९१.२४ टक्के, मालेगाव मध्ये ८७.६० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.८३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८८.३५ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५१०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८०८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६० व जिल्हा बाहेरील ३५ अशा एकूण १ हजार ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. १२ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)