नाशिक। दि. ६ नोव्हेंबर २०२५: महावितरणतर्फे विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने मुकणे डॅम रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा सदर कालावधीत बंद राहणार आहे.
त्यामुळे शनिवारी (दि.८) सिडको, नाशिक रोड, पूर्व विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तसेच रविवारी (दि. ९) कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशन येथे शनिवारी सकाळी १० ते दु. ४ वाजेदरम्यान ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व चाचणीकामी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद राहील, त्यामुळे सदर जलशुद्धीकरण केंद्र येथून शहरातील सिडको व नाशिक पूर्व भागास पाणीपुरवठा होणार नाही.
👉 सिडको: प्रभाग क्र. २४, प्रभाग क्र. २५, प्रभाग क्र. २६, प्रभाग क्र. २७, प्रभाग क्र. २८, प्रभाग क्र. २९, प्रभाग क्र. ३०, पूर्ण पाणीपुरवठा होणार नाही.
👉 नाशिक रोड: प्रभाग क्र. २२ मधील वडनेर गेट, पंपिंगपर्यंत व रेंज रोड या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
👉 नाशिक पूर्व विभाग: नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्र. १४, प्रभाग क्र. २३, प्रभाग क्र. ३० पूर्ण या भागातही पाणी नसेल.
![]()


