नाशिक। दि. ३ नोव्हेंबर २०२५: देशभरातून मान्सून पूर्णपणे परतल्यानंतरही वातावरणीय बदलांमुळे देशात पावसाने पिच्छा पुरवला होता. विशेषतः नाशिकमधून पाऊस माघारच घ्यायला तयार नव्हता. मोंथा चक्रीवादळामुळे पावसाने राज्यातील अनेक भागांत धुमाकूळ घातला. मात्र आता मोंथा चक्रीवादळ शनिवारी हिमालयात विरळले आहे.
नाशिकसह अहिल्यानगर, सोलापुरात पावसाची शक्यता:
राज्यात वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरू असली तरी नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत येथे ढगाळ वातावरण राहणार आहे. ७ नोव्हेंबरपासून पावसाळी वातावरण निवळून थंडीची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


