नाशिक। दि. २३ ऑक्टोबर २०२५: सरकारी अधिकारी असल्याचे भासवून दीड तोळा वजनाचा सोन्याचा गोफ काढून घेत एका ८३ वर्षीय निवृत्त इंजिनिअरची फसवणूक केल्याची घटना कोणार्कनगर ते जत्रा चौफुली मार्गावर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान एच. ए. एल. चे सेवानिवृत्त इंजिनिअर (वय ८३) हे कोणार्कनगरकडून जत्रा चौफुलीकडे पायी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. ते त्यांना बोलण्याच्या नादात बंद असलेल्या के. बी. सी. कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये घेऊन गेले. “आम्ही सरकारी अधिकारी आहोत,” असे सांगत फूस लावून त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचा एक लाख रुपये किमतीचा सोन्याचा गोफ काढून घेतला व ते निघून गेले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनोळखी दुधे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
![]()


