चार दिवस पावसाचे: हवामान विभागाकडून अलर्ट जारी.. ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट !

नाशिक। दि. २३ ऑक्टोबर २०२५: नवरात्र गाजवल्यानंतर दिवाळीतील दोन दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली. आज भाऊबीजेलाही पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 21 ऑक्टोबर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी नाशिकसह राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दरम्यान पुढील चार दिवस हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

नवरात्रौत्सवानंतर पाऊस परतेल असा अंदाज व्यक्त केला जात असताना यंदा दिवाळीत जुलै महिन्याप्रमाणे पाऊस पाहायला मिळाला, त्यामुळे अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे. परतीचा पाऊस कधी परतणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र अद्याप चार दिवस तरी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं संकेत व्यक्त केले जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

🌧️ कुठे आणि कधी असेल येलो अलर्ट….
23 ऑक्टोबर –
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा

24 ऑक्टोबर – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा,अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

25 ऑक्टोबर – पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली.

26 ऑक्टोबर – पुणे, सातारा घाट, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ई-कार डीलरशिपच्या आमिषाने व्यावसायिकाची १४.०७ लाखांची फसवणूक

देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा केली जात असतानाच मंगळवारी, बुधवारी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढचे दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात वारे वाहत असल्याने मुंबई आणि इतर भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790