नाशिक। दि. २२ ऑक्टोबर २०२५: भरधाव वेगात आलेल्या कारने पायी जाणाऱ्या महिलेला दिलेल्या धडकेत महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मयत हिराबाई विश्वनाथ गवळी या दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास म्हसरूळ गावातून रस्त्याच्या कडेने पायी जात होत्या. त्यावेळी एमएच १५ जीएल ७०३१ या क्रमांकाची होंडा अमेझ कार भरधाव वेगात आली. या कारने गवळी यांना
जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गवळी यांच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने गवळी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंद्रूपकर करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३०८/२०२५)
![]()


