🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: बाजारपेठेतील गर्दीमुळे सिटी लिंक बसच्या मार्गात बदल

नाशिक। दि. १९ ऑक्टोबर २०२५: दीपावली खरेदी निमित्त बाजारपेठेत गर्दी होत असल्याने सिटी लिंक बसेस मार्गात बदल करण्यात आला आहे. बसेस पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालीमार यामार्गावरील बसेस मार्गात बदल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; मुद्देमाल जप्त !

या मार्गावर प्रवेश बंद- दिंडोरी नाका निमाणी, सिबीएसकडे येणाऱ्या जाणाऱ्या सिटी लिकं बसेस व मोठी वाहने यांना पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर, शालीमार यामार्गावर वाहतूकीस प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग वरील मार्गावरील बसेस दिंडोरी नाका, पेठ फाटा, मखमलाबाद नाका, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, एचडीएफसी सिग्नल, जुना सीटीबी सिग्नल शरणपुर चौकी, डावीकडे भवानी सर्कल, जलतरण सिग्नल, त्र्यंबक नाका मार्गे इतरत्र जातील. सीबीएसकडून पंचवटी कडे जाणाऱ्या बसेस अशोक स्तंभ, सिद्धेश्वर मंदीर, रामवाडी, मखमलाबाद नाका, पेठफाटा मार्गे इतरत्र जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790