
नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२५: सातपूर येथील एका पबमध्ये रात्रीच्या वेळी केलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रकाश लोंढे त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांच्या टोळीतील फरार संशयित सराईत आरोपी सनी उर्फ ललीत विठ्ठलकर (वय ३५, रा सावतानगर) यास अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने आडगाव येथे ताब्यात घेतले आहे.
घटना घडल्यानंतर सनी विठ्ठलकर हा फरार होता. सातपूर येथे झालेला गोळीबार आणि अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल खंडणीप्रकरणी विठ्ठलकर याचा नाशिक शहर पोलीस शोध घेत होते. त्याचा शोध घेत असतांना पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि पोलीस नाईक भूषण सोनावणे यांना माहिती मिळाली की विठ्ठलकर हा नाशिकमध्ये येत आहे. त्याप्रमाणे सापळा रचून त्याला आडगाव भागांत अटक करण्यात आली. त्याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे (परिमंडळ-२), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, सहायक पोलीस आयुक्त (अंबड विभाग) शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, हवालदार प्रविण बोडके, योगेश चव्हाण, पोलीस नाईक भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव व महिला पोलीस अंमलदार सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे. सदरची कामगीरी करतांना पथकाला महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती तारडे आणि तांत्रिक विश्लेषन विभागाचे सहकार्य मिळाले.
![]()

