नाशिक। दि. १० ऑक्टोबर २०२५: नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीतील नाशिक- त्र्यंबकेश्वर राज्य मार्गालगत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाणिज्य स्वरूपाची इमारत बांधकामे सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता केलेली आहेत.
सदर विनापरवानगीने केलेले बांधकाम स्वखर्चाने काढून घेण्याबाबत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने 6 व 7 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम-53 अन्वये संबंधित मिळकत धारकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
बुधवार 15 ऑक्टोबर 2025 रोजी अनधिकृत बांधकामे निष्कासन करण्याची कार्यवाहीचे नियोजन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार असल्याचे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नाशिक चे महानगर आयुक्त जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
![]()

